गुरुपौर्णमेनिमित्त 24 तासात रांगोळी रेखाटून साकारले. हुबेहूब स्वामी समर्थ. सावरगाव येथील केंद्रात वैष्णवी हिने.
रांगोळी ही कला तर तशी सोपी नाही मात्र सरावातून ती कोणीही आत्मसात करू शकते. पण याच रांगोळीने चित्र काढणे मात्र सोपे नाही. मोठ्या श्रमातून मालेगाव येथील वैष्णवी वाघ या मुलीने ही कृती साध्य केली.
गुरुपौर्णिमेनिमित्त आज सावरगाव येथील स्वामी समर्थ केंद्रात तिने तब्बल २४ तास वेळ देऊन रांगोळीतून अगदी हुबेहूबपणे स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा साकारून सर्वांचे लक्ष वेधले. स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या सावरगाव येथील पुरातन मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. याच निमित्त मालेगाव येथील वैष्णवी वाघ या बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने तब्बल २४ तास वेळ देऊन अगदी चित्राप्रमाणे हुबेहूब स्वामी समर्थांची रांगोळी काढली असून ही रांगोळी येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. किंबहुना रांगोळीच्या दर्शनासाठी दिवसभर गर्दी होतानादिसली.गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शनिवारी दुपारी २ ते रात्री नऊपर्यंत तीने रांगोळी काढली तर पुन्हा रविवारी सकाळी ९ ते रात्री दहापर्यंत पूर्णवेळ देऊन ही मुलगी सदरची रांगोळी काढत होती. विशेष म्हणजे आज चित्र पाहून अगदी रंगसंगती सुद्धा तिने जुळवल्याने क्षणभर ही रांगोळी नाहीच असे पाहणाऱ्याला वाटते इतकी हुबेहूब कलाकृती सावरगाव येथील स्वामी समर्थ मंदिर ट्रस्टच्या सभागृहात तिने काढलीआहे.
मालेगाव येथील विजय वाघ मागील ३२ वर्षापासून सावरगाव येथील स्वामी समर्थांची भक्ती करतात. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलगी वैष्णवी रोज येथे दर्शनाला येते. वडिलांच्या मार्गदर्शना खाली तिने ही रांगोळी काढल्याने सअग्लिकडे तिचे कौतुक होत आहे. सावरगाव विद्यालयाचे प्राचार्य मारोती अलगट, ज्येष्ठ शिक्षक गजानन नागरे, वसंत विंचू आदींनी या रांगोळीचे कौतुक केले.
मंदिरात दर्शनासाठीगर्दी!सावरगाव येथे स्वामी समर्थ महाराजांनी वास्तव्य केल्याने येथील केंद्रात हजारो भाविक दर्शनासाठी येतअसतात.स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील अनेक भाविक येथे आले असल्याने सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. मुंबई येथूनही काही भाविक दर्शनासाठी येथे आलेले होते. गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी निमगाव मढ येथील लभडे महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रमझाला.संभाजी पवार, तुकाराम महाराज पवार, अंबादास निकम, दत्तात्रय पवार, नारायण काटे, अशोक भुरूक, जालिंदर पवार, सुमन लिंगायत, मोतीराम पवार, राजवाडेबाबा, भाऊ काटे आदींसह स्वामी समर्थ भक्त परिवाराने संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजनकेले.
मालेगाव येथील स्वामी भक्त वैष्णवी वाघ या मुलीने रांगोळीतून स्वामी समर्थांचे चित्र काढून भक्ति दर्शविली. सर्व भाविकांनी याचे भरभरून कौतुक केले आहे.
Tags:
भक्ती