पोलिस- महापालिकेची संयुक्त कारवाई, नांदेड सिडकोत मद्यापिंचे अड्डे उधावस्त.

पोलिस- महापालिकेची संयुक्त कारवाई, नांदेड सिडकोत मद्यापिंचे अड्डे उधावस्त.

नांदेड, दि. ४ वाईन शॉपमधून दारुचो 'खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या बसण्याची सोय करणाच्या आठ टपन्या महापालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत हटविण्यात आल्या. शनिवारी दिवसभर सिडको भागातील रुबी वाईन शॉपजवळील रस्त्यावर हो कारवाई करण्यात आली.

सिडको भागात लातूरफाटा ते वसंतराव नाईक महाविद्यालय दरम्यानच्या रस्त्याला लागून स्बी वाईन शॉप नावाचे दारुचे दुकान आहे. या दुकानातून विकल्या जाणाऱ्या दारुच्या ग्राहकांकडून अतिरिक्त व्यवसाय मिळविण्याच्या इराद्याने काही जणांनी चक महापालिकेच्या रस्त्यावर टपऱ्या उभारून तेथे मद्यपींच्या बसण्याची सोय केली होती. उपहार गृहाप्रमाणे टेबल खुर्च्या होत्या. परंतु, तेथे चुल पेटत नव्हती. गॅसही नव्हता. केवळ चकना आणि पाणी मिळत होते. काही उपयांनी दर्शनी भागावर पान शॉप तर काहींनी उपहारगृह असे नाव लिहिले. परंतु तेथे दिवसभर मद्यपींची वर्दळ असायची.

परिसरातील नागरिकांना टपऱ्यांमध्ये बसलेल्या मद्यपींच्या होणाऱ्या भांडणाचा त्रास व्हायचा: मद्यपी उघड्यावरच नैसर्गिक विधी करु लागले. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या महिला व बालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. अनेकांनी महापालिका व पोलिसांकडे तक्रारी केल्या. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी मद्यपींचा हा अड्डाच उद्ध्वस्त करण्याची गाठ मनाशी बांधली आणि महापालिकेला पत्र व्यवहार करून अतिक्रमण विरोधी पथकाला पाचारण केले. वरिष्ठांच्या सुचनेनुसार अतिक्रमण नियंत्रण

पथक प्रमुख गणेश शिंगे यांच्या पथकाने नांदेड ग्रामीण पोलिसांच्या मदतीने शनिवारी दुपारी रुबी वाईन शॉपच्या दोन्ही बाजूने उभारलेल्या लोखंडी पत्र्याच्या आठ अनाधिकृत टपऱ्या यंत्रणेचा वापर करून काढून टाकल्या. तसेच या टपऱ्या जप्त करून परिसर पूर्णपणे मोकळा करण्यात आला आहे. मोठी कारवाई करून टपऱ्या हटविल्या असल्यातरी त्याठिकाणी पुन्हा कुणीही टपऱ्या उभारु नये, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

एक टिप्पणी भेजें

और नया पुराने